Leopards Sighted on Renuka mata Road ; रेणुका माता गडाच्या रस्त्यावर बिबट्यांचे दर्शन ; भाविकात भितीचे वातावरण -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। श्री रेणुका माता गडावर जाणार्या काही अंतराच्या रस्त्यावर बिबट्या दिसल्याने दर्शनासाठी जाणार्या भाविकात व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मध्य रस्त्यात बिबट्या दिसल्यानंतर चार चाकी वाहणाने दर्शनासाठी जाणार्या भाविकांनी त्याचा व्हिडिओ घेवून माध्यमावर प्रसारीत करत दर्शनासाठी येणार्या भाविकांना व गाव खेड्यातील नागरिकांना सावध राहण्याचे आव्हान केले.परंतु या बाबत वनविभागाला अद्याप कुठली ही माहिती नसल्याचे समजते आहे. हे विशेष.
मागील काही दिवसापासून वनविभागाच्या गलथान कारभारामुळे जंगलातील हिंस्ञ प्राणी मानव वस्तीकडे धाव घेत आहे.शहराच्या विविध भागात बिबट्यांचे वास्तव्य कायम असून,वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.तेव्हा वरीष्ठ अधिकार्यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी आता ...
