शेगाव/भोकर,गंगाधर पडवळे। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला.


सकाळी दहा वाजता जगद्गुरुश्रींचे आगमन झाले, त्यानंतर जगद्गुरुश्रींची यजमानांनी शोडशोपचार पूजन केले. आणि त्यानंतर जगद्गुरुश्रींनी सर्व उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन केले व सर्व भाविकांनी स्वामीजींच्या अमृततुल्य प्रवचनाचे सर्वांनी लाभ घेतला
“सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा, गण गण गणात बोते…” या मनोरम्य भजनाने आजच्या कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात जगद्गुरुश्रींनी प्रवचन चालू केले तद्नंतर जगद्गुरूश्रींनी प्रवचनामध्ये समस्या धारकांना व सर्व भक्तांना भक्तीचा काय महिमा आहे, व गुरूंचे आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे, हे अगदी साध्या आणि सरळ वचनांमधून सांगितले. महाभारतामध्ये ही गुरूंचे महत्त्व हे पांडवांना बर्बरी कडून कळाले. बर्बरी ज्याचा एक बाण एका वेळी वृक्षाच्या सर्व पानांना भेदून गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णचं धावून आले.



बर्बरीने गुरुदक्षिणा म्हणून आपलं मुखकमल श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केले, तेव्हाचं पांडव महाभारत जिंकू शकले. जेव्हा पांडव व श्रीकृष्ण बर्बरीला वंदन करायला गेले तेव्हा बर्बरीने म्हटले भगवान सर्व युद्ध तर फक्त तुम्हीच लढत होतात इतर फक्त निमित्त मात्र होते. अगदी त्याप्रमाणेच जगद्गुरु श्रींच्या या सामाजिक विकासाच्या चळवळीमध्ये त्यांच्यासोबत कार्य करणारे निमित्त कारण आहे. करता करविता गुरु असतात अगदी जगद्गुरुश्रींच्या ही आयुष्यात गजानन महाराजांचे गुरुस्वरूप लाभल्यामुळे त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला.


त्यानंतर स्वामीजींनी सांगितले की आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आयुर्वेद जीवनशैली व उपचार पद्धती हीच सर्वोत्तम आहे. आपल्या वेदांमध्ये आध्यात्मिक शास्त्रामध्ये विविध शस्त्रकर्म, टेस्ट ट्यूब बेबी सारखे उपचार अगोदरच वर्णित आहेत, परंतु आपल्याला आपल्याच शास्त्रांवर विश्वास नाही. जगद्गुरुश्रींनी सांगितले की आपण आध्यात्मिक शास्त्राला शास्त्रीय भाषेत अभ्यासले पाहिजेत. अंधश्रद्धा व अध्यात्म यातील फरक समजून आपले मन अध्यात्मावादी, बुद्धी वास्तववादी व डोळे विज्ञानवादी ठेवले पाहिजेत. आपल्या आयुष्यामध्ये बिनचूक निर्णय घेऊन डोळसपणे आयुष्य जगले पाहिजेत. जगद्गुरुश्री म्हणाले की आम्हीही तुमच्यासारखाचं प्रपंच करतो, आम्ही प्रपंच सोडला नाही परंतु गुरुकृपेने आम्ही परमार्थाचा राजा झालो. हे केवळ निरपेक्ष, निरीच्छश्रद्धा भावामुळे शक्य झाले, जसे रामदास स्वामी म्हणतात “परमार्थी नाही तो भिकारी, परमार्थी तो राज्यधारी” त्यामुळे तुम्हीही प्रपंचात राहून परमार्थ करू शकता.

“तुझं आहे तुझं पाशी, परी वेड्या जागा चुकलासी” या उक्तीनुसार आपणच स्वतः आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत व आपण स्वतःच आपल्या समस्या सोडवतो फक्त दहा मिनिटे उक्त नामस्मरण म्हणजेच भक्ती करणे गरजेचे आहे. भगवंत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हृदयात विराजित असून जळी-स्थळी काष्टी-पाशानी म्हणजेच कणाकणात देव वसलेल आहेे, म्हणून स्वामीजी म्हणतात की “अनु रेणुत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे.” फक्त आपण त्यांच्या चरणाशी अखंड शरणागत झालो पाहिजेत.
आपलं संपूर्ण जीवन त्यांच्या चरणावरती अर्पण करून “मारणार ही तोच, तारणार ही तोच” असा श्रद्धाभव ठेवून गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजेत व समर्पित भावनेने गुरूंना शरण गेले पाहिजे. आपली जशी भगवंतावर श्रद्धा असते तसाच तो फळ देत असतो, जर तुम्हाला खरंच सुखी व्हायचं असेल तर फक्त आणि फक्त दहा मिनिटे भक्ती करा आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. प्रवचनाच्या शेवटी स्वामीजींनी सगळ्यांना आशीर्वाद दिलेत.
आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी जगद्गुरुश्रींच्या दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यामध्ये 270 भाविकांनी साधक दीक्षा घेतली. आजच्या भव्य दिव्य कार्यक्रमाला 20 ते 25 हजार भाविकांनी उपस्थित राहून जगद्गुरुश्रींच्या अमृतमय प्रवचनाच्या व दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. असाच भव्य दिव्य जगद्गुरुश्रींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम पुन्हा 11 आणि 12 नोव्हेंबर 2024 ला पश्चिम विदर्भ उपपीठ, शेगाव, जि. बुलढाणा येथे होणार आहे अशी माहिती पश्चिम विदर्भ उपपिठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायबसे साहेब, पीठ व्यवस्थापक श्री सुरेश मोरे साहेब, पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी दिली.


