जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शेगाव येथील दर्शन, मार्गदर्शन सोहळ्यात घेतले लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ -NNL
शेगाव/भोकर,गंगाधर पडवळे। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दोन दिवसीय समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला.
सकाळी दहा वाजता जगद्गुरुश्रींचे आगमन झाले, त्यानंतर जगद्गुरुश्रींची यजमानांनी शोडशोपचार पूजन केले. आणि त्यानंतर जगद्गुरुश्रींनी सर्व उपस्थित भक्तगणांना मार्गदर्शन केले व सर्व भाविकांनी स्वामीजींच्या अमृततुल्य प्रवचनाचे सर्वांनी लाभ घेतला
"सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा, गण गण गणात बोते..." या मनोरम्य भजनाने आजच्या कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात जगद्गुरुश्रींनी प्रवचन चालू केले तद्नंतर जगद्गुरूश्रींनी प्रवचनामध्ये समस्या धारकांना व सर्व भक्तांना भक्तीचा काय महिमा आहे, व गुरूंचे आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे, हे अगदी साध्या आणि सरळ वचनांमधून सांगितले. महाभारतामध्...
