नांदेड/किनवट| नांदेड पोलीस दलातर्फे मिशन समाधान अंतर्गत ग्रामीण भागातील आदिवासी महिलांकरीता सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन किनवट येथे करण्यात आले होते. यावेळी मिशन सहयोग च सुरुवात करण्यात आली.


पोलीस प्रशासन आणि समाज यांचा एक घनिष्ट संबध असतो. पोलीसांच्या कामकाज पध्दतीचा परिणाम समाजावर पडत असतो पोलीस प्रशासन 24X7 समाजासाठी कार्यरत असतात. अशा वेळी दैनंदिन कामकाजाशिवाय सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विधायक कार्य करण्याकरीता अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली ‘मिशन सहयोग’ ची सुरूवात करण्यात आली.

“मिशन सहयोग” अंतर्गत खालील 08 नाविन्यपूर्ण 1. ऑपरेशन बीट कनेक्ट, 2. मिशन उडान, 3. ऑपरेशन वारसा जतन, 4. नांदेड पोलीस लीग (NPL). 5. मिशन महिला सुरक्षा, 6. मिशन समाधान, 7. मिशन निर्धार, 8. मिशन एकता उपक्रमां पैकी “मिशन समाधान” अंतर्गत दिनांक 13.06.2025 रोजी नांदेड जिल्हयातील किनवट येथील ग्रामीण भागातील आदिवासी महिला यांना सायबर जनजागृती उपक्रमासाठी MFIN मायक्रो फायनान्स यांनी पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण, सायबर सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांना गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.


सदर कार्यशाळेत किनवट तालुक्यातील अंदाजे 150 आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांनी सहभाग घेतला होता. सदर महिलांना पोउपनि / मारोती चव्हाण व पोलीस कॉस्टेबल / यन्नावार सायबर सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांनी सायबर गुन्हयांचे प्रकार, सोशल मिडिया वापरताना घ्यावयाची काळजी, पासवर्ड सुरक्षितता, ऑनलाईन फसवणुक, डिजिटल फुटप्रिंट याबाबत उदाहरणांसह सविस्तर माहिती देण्यात आली. आदिवासी महिलांशी संवाद साधून त्यांचे शंकाचे समाधान केले तसेच सायबर गुन्हयांबाबत तक्रार कुठे व कशी नोंदविण्यात यावी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सायबर जनजागृती उपक्रमात 150 आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच श्री बाबुराव सोनकांबळे, श्री दिलीप दमयावार, श्री प्रेमकुमार आडे, श्री नितीन देशपांडे, श्री देवेंद्र शहापूरकर व MFIN मायक्रो फायनान्सचे अधिकारी व कर्मचारी असे मोठया प्रमाणात हजर होते.