करियरनांदेड

Job fair organized : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन

Job fair organized by District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Center नांदेड| युवक- युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार 27 जून रोजी श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 275 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

WhatsApp Image 2025 06 30 at 12.59.21 PM Job fair organized : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द उद्योजक अभिजीत रेणापूरकर तर अध्यक्ष आदित्य मोटर्सचे उद्योजक अरूणजी फाजगे हे होते. जिवन हे एक शर्यत आहे. या शर्यतीमधुन अनेक गोष्टी बदल होतात. इथं जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा फायदा सर्वानी घ्यावा, असे मार्गदर्शन उद्योजक अभिजीत रेणापूरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच शिक्षण घेत असताना गुरूजनांचा विचार करा, समाजात वागताना आईवडीलांकडे बघा, संधीच सोन करा असा संदेश आदित्य मोटर्सचे उद्योजक अरूणजी फाजगे यांनी दिला.

विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करावे. सध्या या जगात कौशल्यालाच मागणी आहे. या आधुनिक जगात कौशल्य नसल्यास जीवन जगणे कठीण आहे असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले.

WhatsApp Image 2025 06 30 at 12.59.10 PM 1 Job fair organized : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन

या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 16 कंपन्यांनी 1 हजार 513 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला होता. तर एकूण 560 उमेदवार उपस्थीत होते यामधून 275 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने दिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!