नांदेड l येथील हॅनेमन होमिओपॅथी फोरम शाखा नांदेड च्या वतीने होमिओपॅथील तज्ञांसाठी क्लास रुम ट्रेनिंग कार्यक्रमाचे सिडको एमआयडीसी येथील हॉटेल मंजू पॅलेस येथे २४,२५,२६ जानेवारी अशा तिन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या ट्रेनिंग कार्यक्रमासाठी जिल्हयासह मराठवाडा आणि शेजारील राज्यातून होमिओपॅथी तज्ञांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली आहे .

या ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मुख्य हेतू हा होमिओपॅथी क्षेत्रात झालेले नवीन संशोधन व उपचारांबद्दलची माहीती आपल्या भागातील होमिओपॅथी तज्ञांना व्हावा कारण आजघडीला संसर्गजन्य आजारा सोबतच मानसिक आजारांचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे,ताणतणाव हे खूपच वाढलेले आहेत.अनेकप्रकारचे उपचार करून आजार बरे होत नाहीत. सद्यघडीला होमिओपॅथी हे शास्त्र अत्यंत प्रगत झालेले आहे.नवनवीन प्रकारचे संशोधन हे प्रत्येक औषोधपचार पद्धतीत होत असते.तसेच होमियोपॅथिक शा स्त्रामध्ये नवनवीन संशोधन होत आहेत.

याबाबतची माहिती होमियोपॅथिक तज्ञांना व्हावी या करिता मुंबई , नाशिक आणि जळगाव येथून प्रसिद्ध होमियोपॅथिक तज्ञ नांदेड येथे खास मार्गदर्शनासाठी आलेले आहेत. यात मुंबई येथून डॉ. मयुरेश महाजन, कृष्णकुमार दिंडे तर नाशिक हून डॉ. सुनील घोडके

व जळगांव येथून डॉ. यशवंत पाटील हे आलेले आहेत. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॅनेमन होमिओपॅथी फोरम नांदेडच्या वतीने डॉ. अशोक बोनगुलवार, डॉ.संजय लाठकर, डॉ. ओमप्रकाश कुचन, डॉ.सुनिल केउलवार,डॉ.वर्षा देशमुख,डॉ.अर्चना उपलंचेवार, डॉ.रश्मी बंगाळे, डॉ.शुभम मुंदडा यांच्यासह फोरमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्य मंडळी परिश्रम घेत आहेत.

होमिओपॅथी म्हणजे रोग नाही रोगाचे कारणच नष्ट करते..!
जगभरातील कोट्यवधींपेक्षा जास्त नागरिक होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे आहेत. अॅलोपॅथी हे रोगांचे निदान, चाचणी आणि उपचार पद्धतीत ही सगळ्यात विश्वासार्ह गोष्ट असली तरी होमिओपॅथी हे रोग दाबून ठेवत नाही तर तो रोग मुळापासून नष्ट करण्यासाठी विश्वासार्ह मानला जातो.