Hahnemann Homeopathy ; हॅनेमन होमिओपॅथी फोरम च्या वतीने प्रशिक्षण शिबीरास सुरूवात
नांदेड l येथील हॅनेमन होमिओपॅथी फोरम शाखा नांदेड च्या वतीने होमिओपॅथील तज्ञांसाठी क्लास रुम ट्रेनिंग कार्यक्रमाचे सिडको एमआयडीसी येथील हॉटेल मंजू पॅलेस येथे २४,२५,२६ जानेवारी अशा तिन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या ट्रेनिंग कार्यक्रमासाठी जिल्हयासह मराठवाडा आणि शेजारील राज्यातून होमिओपॅथी तज्ञांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली आहे .
या ट्रेनिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मुख्य हेतू हा होमिओपॅथी क्षेत्रात झालेले नवीन संशोधन व उपचारांबद्दलची माहीती आपल्या भागातील होमिओपॅथी तज्ञांना व्हावा कारण आजघडीला संसर्गजन्य आजारा सोबतच मानसिक आजारांचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे,ताणतणाव हे खूपच वाढलेले आहेत.अनेकप्रकारचे उपचार करून आजार बरे होत नाहीत. सद्यघडीला होमिओपॅथी हे शास्त्र अत्यंत प्रगत झालेले आहे.नवनवीन प्रकारचे संशोधन हे प्रत्येक औषोधपचार पद्धतीत होत असते.तसेच होमियोपॅथिक शा स्त्राम...
