नवीन नांदेड l शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिडको येथील धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे चौक येथे शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटिल गिरडे यांच्याहस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी सिडको येथील उस्माननगर रस्ता लगत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे चौक येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात य्आले तर जयंती निमित्त उधाण येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आनंद दिघे ट्रस्टचे कल्याण दरेंगावे,नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव,सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे ,जिल्हासंघटक शंकर पिनोजी ,दशरथ कंधारे ,उपशहर प्रमुख पप्पू गायकवाड यांच्या सह पदाधिकारी, नागरिक उपस्थिती होते.
