किनवट, परमेश्वर पेशवे l तालुक्यातील मौजे अंदबोरी ची येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दृश्यमान स्वच्छता या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सचिव व सर्व सदस्य यांनी ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र बोलावून बैठक घेण्यात आली.

यावेळी कचरा विलगीकरण विल्हेवाट या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात येऊन आपले गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला. यावेळी कचरा विलगीकरण आणि विल्हेवाट या विषयावर स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती किनवटचे समन्वयक संतोष कांबळे यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच ग्रामसेवक खिल्लारे यांनी आपले मत मांडले.

बचत गटाच्या सीआरपी सौ साखरे मॅडम यांनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत घर स्वच्छतेबरोबर गाव स्वच्छता ही एक आपली जबाबदारी आहे असा महत्त्वपूर्ण मत त्यांनी मांडले. आणि गाव स्वच्छतेच्या साठीचे सुंदर असे नियोजनही याप्रसंगी करण्यात आले.

याप्रसंगी बैठकीला सरपंच प्रतिनिधी संजय अंभोरे ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर साखरे तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तीसह इतरही मान्यवर गावकरी उपस्थित होते. हरी ओम महिला बचत गट, जय बजरंग बली महिला बचत गट, श्री गणेश महिला बचत गट मातोश्री महिला बचत गटाच्या अध्यक्ष सचिव सह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
