नांदेडसोशल वर्क

अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ -NNL

नांदेड। लहुजी साळवे बालकाश्रम धनगरवाडी आणि इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस हनुमान पेठ नांदेड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून, याप्रसंगी अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ करून आगळ्या वेगळ्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून अनाथाश्रम आणि इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस येथे ॲड.ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते.अनाथ मुलांना मदत म्हणून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाजप महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या तर्फे लहुजी साळवे बालकाश्रम येथे विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हैदराबाद येथील सुप्रसिध्द समाजसेविका स्नेहलता जयस्वाल यांनी भूषविले. याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट, लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, दानशूर नागरिक अशोक पडगिलवार,अरुण काबरा, सुरेश शर्मा, राजेशसिंह ठाकूर,सविता काबरा, प्रा. वर्षा कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

IMG 20240816 WA0008 अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप करून कृपाछत्र उपक्रमांचा शुभारंभ -NNL

सुरुवातीला संस्थेचे सचिव लालबाजी घाटे यांनी प्रास्ताविक करताना गेल्या अनेक वर्षापासून दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून अनाथ विद्यार्थ्यांना नेहमी मदत मिळत असल्याचे सांगितले. यानंतर दिलीप ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, कृपाछत्र उपक्रमाच्या पाचव्या वर्षी सफाई कामगार, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वृत्तपत्र विक्रेते, रस्त्यावरील बेघर यांना २०२४ छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत.आता पर्यंत २५८ छत्र्यांसाठी देणगीदार मिळाले आहेत.त्यामध्ये धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ५० तर हॉटेल मिडलँड गोकुळनगर नांदेड व स्नेहलता जायसवाल हैदराबाद यांच्यातर्फे प्रत्येकी ३२ छत्र्या मिळाल्या आहेत.

प्रत्येकी १६ छत्र्या देणाऱ्या मध्ये प्रमिला महेश भालके, डॉ. गोविंद भाकरे,एक राम भक्त,अशोक विठ्ठलराव पडगीलवार, रुहिका रूपेश मुत्तेपवार, सुरेश शंकरराव पळशीकर,आनंद सिताराम साताळे, ला. शिवाजीराव पाटील,मोहित व रेणुका सोनी यांचा समावेश आहे. सर्व देणगीदारांच्या हस्ते छत्र्याचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी पुढे बोलताना ठाकूर असे म्हणाले की,नियतीने अनाथ मुलांवर अन्याय केला असल्यामुळे जे नागरिक सुस्थितीत आहेत त्यांनी या अनाथाश्रमाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

या प्रसंगी सुरेश लोट,स्नेहलता जयस्वाल,सविता काबरा,राजेशसिंह ठाकूर, सुरेश शर्मा, प्राध्यापिका कुटे, शिवाजीराव पाटील यांची समयोचित भाषणे झाली. संस्थेच्या अध्यक्षा रेखा घाटे यांनी सर्वांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अधिक्षक ज्ञानेश्वर भांडवले यांनी तर आभार नंदकुमार गायकवाड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काळजी वाहक मिना गायकवाड,प्रतिभा जाधव,भुंजग नामपल्ले शिवाजी पवळे, सत्यभामा पवळे यांनी परिश्रम घेतले.

इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्विसेस येथे झालेल्या स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वयंसेवक अरूण बापू किनगावकर हे होते.सुरुवातीला व्यवस्थापकीय संचालक शेखर भावसार यांच्या हस्ते दिलीप ठाकूर व इतर अतिथींचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना दिलीप ठाकूर यांनी ऊन, पाऊस ,थंडीची तमा न बाळगता चोख कामगिरी बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांना छत्र्या देणार असल्याची घोषणा केली.

किनगावकर यांनी समायोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी भास्कर अत्रे,अप्पा ध्याडे, राजेशसिंह ठाकूर,श्रीपाद पोरवाल, बालाजी वाकोडे, रामेश्वर जाधव, राजेन्द्र ताटे,जयप्रकाश क्षीरसागर,प्रकाश बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख अब्दुल,संदीप ठाकूर,ज्योती गायकवाड,सोनाली वाघमारे,कुमार मॅडम, तस्लिम, सूर्यवंशी,रमेश शिंदे, ज्योत्स्ना मॅडम,राजकिशोर ठाकूर, पतंगे मॅडम, सुनिता देशमुख,पंडित पांचाळ यांनी परिश्रम घेतले.दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अनाथ मुलांना व सुरक्षा रक्षकांना छत्र्या वाटप केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!