नवीन नांदेड l जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित विकास नगर गृहनिर्माण संस्था कौठा ता.जि.नांदेड चासंचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक पुर्व दोन जागा बिनविरोध निवडून आल्या असुन उर्वरित आकरा जागेसाठी 16 फेब्रुवारी रोजी विकास नगर कौठा येथील कार्यालयात मतदान झाले असून एकुण 190 मतदारा पैकी 162 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सायंकाळी झालेल्या मतमोजणी मध्ये विकास पॅनलने बाजी मारून 11जागा जिंकुन सत्ता काबीज केली तर प्रगती पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

पंचवार्षिक निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी विकास पॅनल व प्रगती पॅनल मध्ये अटीतटीच्या लढत होत होऊन निवडणूक पुर्व दोन जागा अनुक्रमे ईतर मागासवर्गीय मधुन बाबाराव माधवराव ईबतवार व अनु.जाती जमाती मधुन अभय मोरे बिनविरोध निवडून येऊन विकास पॅनलने बाजी मारली,उर्वरित सर्व साधारण गटातील आठ जागेसाठी 16 ऊमेदवार तर महिला राखीव मतदारसंघ संघात दोन जागे साठी चार ऊमेदवार तर विमुक्त भटक्या जाती जमाती व विमा प्रवर्गातील एक जागा दोन ऊमेदवार अशा आकरा जागेसाठी निवडणूक झाली, सकाळी 9 ते 4 दरम्यान झालेल्या मतदान प्रक्रियेत 75/ टक्के मतदान झाले.

निवडणूक अधिकारी म्हणून संतोष सरकटे तर सहाय्यक म्हणून बि.बी.बौधगिरे यांनी सहकार्य केले, ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मतदान प्रक्रियेत सभासद असलेले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण चिखलीकर यांनी मतदान हक्क बजावला.


सायंकाळी झालेल्या मतमोजणी मध्ये सर्वसाधारण गटातील विकास पॅनलचे थोरवटे प्रल्हाद मुकूंदराव 80,देशपांडे देवदत भानुदासराव 88,बसवदे उध्दव माणिकराव 87,बुलबले राजेश बालाजीराव 99 रादंड वेणुगोपाल रामदड 81,लालवाणी कुमार नरेश 85,वरपडे ऊतम शंकरराव 80,बडवणे गंगाधर कोंडीबाराव 79,महिला राखीव मध्ये पद्मवार शोभा शंकरराव 92,लखमवार सविता विठ्ठल 85 विविध जाती भटक्या प्रवर्ग मधुन पेटलवार रविंद्र रामचंद्रराव 87 हे निवडुंनआले आहेत ,या पतसंस्थेवर विकास पॅनलने बहुमत मिळून संता काबीज केली आहे, विजयी झाल्यानंतर संचालक मंडळ यांच्या सत्कार करून फटाक्यांची आतिषबाजी मध्ये शुभेच्छा देण्यात आल्या.


