Farewell to Ganapati Bappa : सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे वतीने गणपती बाप्पा ला निरोप -NNL

नवीन नांदेड| सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने टिनशेड येथे बसविण्यात आलेल्या श्री गणेश मूर्ती सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे मुर्ती संकलन केद्रं येथे विधिवत पुजन आरती करून देण्यात आली, यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देण्यात आल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून टिनशेड येथे गणपती मुर्ती बसविण्यात येत आहे, यावर्षी ही गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली, दैनंदिन सकाळी व सायंकाळी महाआरती प्रसाद आयोजित करण्यात आले. अंनत चतुर्थी निमित्ताने १७ सप्टेंबर रोजी महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते.

यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, छायाचित्र कार सारंग नेरलकर, तिरूपती पाटील घोगरे यांच्या सह संघटनेचे सतिश कदम, दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे,महिला वितरक वंदना लोणे, जेष्ठ विक्रेते शेख सयौधदीन, दौलतराव कदम, मदनसिंह चौहान, शुभम कुंभार, साहेबराव, यांच्या सह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. यावेळी दुपारी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम, तातेराव वाघमारे, गणेश ठाकूर यांनी विधीवत पुजन करून मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे गणेश मूर्ती संकलन केद्रं येथे मुर्ती दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button