बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर। तालुक्यातील खतगावचे भुमीपुञ तथा माजी राज्यमंञी भास्करराव पाटील खतगावकर यांनी शंकरनगर येथे दि.१२ सप्टेंबर रोजी आपल्या कार्यकत्यांची एक बैठक घेतली.या बैठकीनंतर दादा लवकरच भाजपाचे कमळ सोडून हातात हात घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.सध्या काँग्रेस मध्ये खासदार वसंतराव चव्हाण निधनामुळे जिल्हा पातळीवर काम करण्याची क्षमता असनारे नेते भाजपाच्या तुलनेत कमी असल्याने व आपल्या सुनबाई डाँ.मिनल खतगावकर यांच्या सह अन्य दोघांना उमेदवारी मिळण्याच्या अटीवर दादांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.खतगावकरांच्या या पक्ष बदलाच्या निर्णयामुळे माञ बिलोली तालुक्यातील काहींनी स्वागत करत आहेत.तर काही कार्यकर्ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून विरोध करताना दिसून येत आहेत.
शंकरराव चव्हाण यांच्या तालिमीत तयार होऊन काँग्रेस पक्षातुन आपल्या राजकीय जिवनाची सुरूवात केलेल्या भास्करराव पा.खतगावर यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात काम केले.या बदल्यात त्यांना आमदार,खासदार,राज्यमंञी यासह नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाचा मान मिळाला.त्यानंतर मध्यंतरीच्या काळात काही कारणाने भास्करराव पा.खतगावकर यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला होता.भाजपा प्रवेशानंतर खतगावकर यांचा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आपली पतही मिळवली होती.माञ देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर काही महिन्यातच झालेल्या देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीच्या ऐन तोंडावरच अशोकराव चव्हाण यांच्या शब्दावरून खतगावकर यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला.
भाजपा सोडून काँग्रेसमध्ये झालेल्या घरवापसीनंतर काही महिन्यांपुर्वी भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांनी संबंध महाराष्ट्राला धक्का देत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचाच भाजपात पक्ष प्रवेश घडवून आणला.अशोकरावांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्या नंतर नांदेड जिल्ह्यातील अशोकरावांनीच तयार केलेल्या कार्यकर्त्यांनी संयमाची भुमिका घेत भाजपा प्रवेशाचा निर्णय राखून ठेवला होता.अशोकरावांच्या भाजपा भाजपा प्रवेशा नंतर फक्त अमर राजुरकर व भास्करराव पाटील खतगावकर या दोघांनी लागलीच पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला होता.अशोकरावांसोबत भाजपात येताना खतगावकरांना आपल्या सुनबाई सौ.मिनल निरंजन पा.खतगावकर यांच्या आमदारकीचे स्पप्न पुर्ण होईल अशी अपेक्षा होती.
त्या अपेक्षेखातर अशोकरांवरील प्रेमा खातर खतगावकरांनी भाजपात प्रवेश घेतला माञ भाजपात प्रवेश घेऊनही आपल्या सुनबाईला नायगाव विधानसभा मतदार संघातुन आमदारकीचे टिकीट मिळण्याची आशा धुसर होताना दिसताच डाँ.मिनल खतगावकर यांनी श्रावण महिन्यात धर्माबाद तालुक्यातील संगम येथील महादेव मंदिरात आयोजित महाप्रसाद व अन्य धार्मिक कार्यक्रमावेळी भाजपाकडून विधानसभेचे टिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहिरही केले होते.
अपक्षाच्या तयारीत असताना स्वत डाँ.मिनल खतगावकर यांनी मराठी आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतवाली सराटी येथे जाऊन भेटही घेतली होती.असे असताना खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर नियमानुसार पोट निवडणूक होणार आहे.या पोट निवडणूकीसाठी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुञ बडू पा.चव्हाण यांना उमेदवारी देण्याची शिफारस करण्यात.जिल्हा कार्यकारणीच्या शिफारसी नुसार बंडू पा.चव्हाण यांना उमेदवारी मिळेलही.माञ याच वेळी माजी मंञी खतगावकर यांच्याही पक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या.
पक्ष बदलाच्या चर्चा होत असताना दि.१२ सप्टेंबर रोजी भास्करराव पा.खतगावकर यांनी शंकरनगर येथे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी पाचारण केले.या बैठकीत दादांसोबत असणाऱ्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी दादा घेतील तो निर्णय मान्य असल्याचे जाहिरही केले.तर दादांनीही तसे संकेत दिल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.शंकर नगर येथील बैठकी नंतर माञ बिलोली तालुक्यात दादांच्या भुमिके विषयी समिश्र चर्चा होत असून काहींनी दादांच्या निर्णयाला सकारात्मक दृष्टीने पाहत असताना काहींनी माञ याबाबात सोशल मिडीयावर नाराजीचा सुर आवळताना दिसत आहेत.
देगलुर,बिलोली,धर्माबाद,नायगाव तालुक्यावर दादांची पकड
माजी मंञी भास्करराव पा.खतगावकर यांचा गेल्या दोन तीन दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात दादांचे वजन असले तरी त्यांची बिलोली,देगलुर, धर्माबाद, नायगाव तालुक्यात चांगलीच पक्कड आहे.सर्व वयोगटातील कार्यकर्ते जोडून ठेवण्यात तरबेज असलेल्या खतगावकर यांचे देगलुर विधानसभा मतदार संघाकडे नेहमीच विशेष लक्ष असते.या मतदार संघातील विधानसभा निवडणूकीत दादांनी अनेकदा ठरवून एखाद्याला पाडले आहे.तर अगदी कोणाच्याही परिचयात नसलेल्या कै.रावसाहेब अंतापुरकर यांना स्वतःच्या जिवावर निवडून आणल्याचेही उघड आहे.