Politics special ; दादांच्या पक्ष बदलाला बिलोली तालुक्यात काहींचे समर्थन तर काहींचा सोशल मिडीयावर नाराजीचा सुर -NNL
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर। तालुक्यातील खतगावचे भुमीपुञ तथा माजी राज्यमंञी भास्करराव पाटील खतगावकर यांनी शंकरनगर येथे दि.१२ सप्टेंबर रोजी आपल्या कार्यकत्यांची एक बैठक घेतली.या बैठकीनंतर दादा लवकरच भाजपाचे कमळ सोडून हातात हात घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.सध्या काँग्रेस मध्ये खासदार वसंतराव चव्हाण निधनामुळे जिल्हा पातळीवर काम करण्याची क्षमता असनारे नेते भाजपाच्या तुलनेत कमी असल्याने व आपल्या सुनबाई डाँ.मिनल खतगावकर यांच्या सह अन्य दोघांना उमेदवारी मिळण्याच्या अटीवर दादांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.खतगावकरांच्या या पक्ष बदलाच्या निर्णयामुळे माञ बिलोली तालुक्यातील काहींनी स्वागत करत आहेत.तर काही कार्यकर्ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून विरोध करताना दिसून येत आहेत.
शंकरराव चव्हाण यांच्या तालिमीत तयार होऊन काँग्रेस पक्षातुन आपल्या राजकीय जिवनाची सुरूवा...
