Meritorious students felicitated : सिडको भावसार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -NNL

नांदेड| भावसार समाज सिडको नांदेड ,युनायटेड भावसार ऑर्गनायजेशन सिडको नविन नांदेड ,भावसार महिला मंडळ सिडको नविन नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षातील भावसार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच संपन्न झाला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश सितावार हे तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद सूत्रावे, शशिकांत ढवळे,प्रभारी कुल सचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड, अनिरुद्ध दांडगे ,संजय घोगरे, प्रमोद टेहरे राजु लांडगे, राजेंद्र देवनिकर, संजय काचावार ,रामदास पेंडकर आदी मान्यवर व्यासपीठावर हे होते.

यावेळी बालवाडी ते दहावी,बारावी ,पदवी , पदव्युत्तर पास , पाचवी व आठवी स्कॉलरशिप , एन. एम. एम. एस.,नवोदय , एन.टी. एस, व ईतर समकक्ष परीक्षा, सर्व व्यवसाय प्रशिक्षण,विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात विशेष कार्य केलेले व ज्येष्ठ नागरिक यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात १०० हून अधिक भावसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ,वही-पेन, फाईल, परीक्षा पॅड, विविध स्कॉलरशिप व शैक्षणिक माहिती पत्रक देऊन मार्गदर्शन करण्यात आले.भावसार समाज सिडको कार्यक्षेत्रातील दहावी व बारावी प्रथम विद्यार्थ्यांच्या मातेस आदर्श माता पुरस्कार व पैठणी साडी सप्रेम भेट देण्यात आली.

सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री हिंगुलांबिका देवी, संत जनाबाई वायचळ भावसार व भावसार समाजाचे आद्यसंघटक महादेवरावजी तेलकर यांचे प्रतिमेचे पुष्पहार,पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे युवा भावसार दिनदर्शिका, तुळशी रोप, आंबा वृक्ष रोप, पुष्पहार,तिरंगा सन्मान वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वानंद परळकर, राजू आंबेकर, सचिन पेटकर, शशांक कठाडे, नरेश बरडे, संदिप काब्दे ,डॉ. सुनील मुधोळकर, प्रशांत पेंडकर,अनंत पेटकर, माळवतकर लक्ष्‍मण, मयुर सुत्रावे, आर्यन पेटकर, तेजस माळवे, तेजस दोटकर यांनी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थी,पालक,महिला,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button