Homeनांदेडaccident ; वाई बाजार नजीक बस व दुचाकीचा भिषण अपघात ; सालगडी...

accident ; वाई बाजार नजीक बस व दुचाकीचा भिषण अपघात ; सालगडी इसमाचा जागीच मृत्यू – NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील बाजार ते साईनगर फाट्याच्या मधोमध दि. २० रोजी दु. २ वा. च्या सुमारास बस व दुचाकीच्या भिषण अपघातात एकजण जागीच ठार झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

दि. २० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास सारखणी माहूर राष्ट्रीय महामार्गावरील वाई फाटा ते साईनगर दरम्यान हा अपघात झाला. नागपूर वरून किनवट बस क्र. एम.एच. ०६ एस. ८५३२ येत होती. त्याचवेळी आसोली येथील फुलसिंग गुलाब चव्हाण वय ४३ हा वाई बाजार कडून साईनगर च्या दिशेने जात होता. यावेळी सदरचा अपघात झाला. झालेला अपघात एवढा भिषण होता की बसने दुचाकीला अक्षरश: ५० फुटांपर्यंत फरफटत नेल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून येत असून दुचाकी चालक फुलसिंग गुलाब चव्हाण याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे.घटनेची माहीती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळावर हजर झाले असून पुढील पोलीस प्रक्रिया सुरू आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments