Meritorious students felicitated : सिडको भावसार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न -NNL
नांदेड| भावसार समाज सिडको नांदेड ,युनायटेड भावसार ऑर्गनायजेशन सिडको नविन नांदेड ,भावसार महिला मंडळ सिडको नविन नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षातील भावसार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतीश सितावार हे तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद सूत्रावे, शशिकांत ढवळे,प्रभारी कुल सचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड, अनिरुद्ध दांडगे ,संजय घोगरे, प्रमोद टेहरे राजु लांडगे, राजेंद्र देवनिकर, संजय काचावार ,रामदास पेंडकर आदी मान्यवर व्यासपीठावर हे होते.
यावेळी बालवाडी ते दहावी,बारावी ,पदवी , पदव्युत्तर पास , पाचवी व आठवी स्कॉलरशिप , एन. एम. एम. एस.,नवोदय , एन.टी. एस, व ईतर समकक्ष परीक्षा, सर्व व्यवसाय प्रशिक्षण,विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्...
