हिमायतनगर| शहरातील ज्या शेतकऱ्यांना गतवर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. त्या सर्व शेतकऱ्यांनी तातडीले आपल्या बँकेच्या खात्याची ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केल्यानंतर हिमायतनगर येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने हे शहर परिसरातील ज्या शेतकऱ्यांची नवे यादीत आहेत त्यांना दूरध्वनीवर संपर्क करून आपले नाव अतिवृष्टीच्या अनुदान यादीत आलेले आहे असे सांगत तात्काळ बँक खात्याची ई-केवायसी करून घेऊन अनुदान प्राप्त करून घ्यावे अशी विनंती करत आहेत.


हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी सामाजिक कार्यात हीरीहीने सहभागी होणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा परमेश्वर मंदिराचे संचालक संजय माने हे ज्या शेतकऱ्यांना आपल्या नावाने अनुदान आले किंवा यादीत नाव आहे कि नाही. याची माहीती नसलेल्या यादीतील त्या प्रत्येक शेतकऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून तुमचे नावाने अनुदान मंजूर होऊन शासनाकडून आले आहे असे सांगत आहेत. अनुदान मिळविण्यासाठी तात्काळ आपल्या बँकेच्या खात्याची ई-केवायसी करून घ्यावी असे सांगून त्यांना मदत करत आहेत. त्यामुळे हिमायतनगर शहरातील बऱ्याच शेतकऱ्यांना शासनाच्या अतिवृष्टीच्या अनुदानाचा फायदा होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसापासून श्री परमेश्वर मंदिरात थांबून अतिवृष्टी अनुदानाचे यादीतील प्रत्येकांना फोन लावण्याचे काम करून त्यांचे अनुदान म्हणजे आर्थिक मदत परत जाऊ नये यासाठी धडपड करत असल्याचे पाहून श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी देखील संजय माने यांच अभिनंदन केल आहे. यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या ज्येष्ठ संचालिका लताताई पाध्ये, वामनराव बनसोडे, अनिल मादसवार, विलासराव वानखेडे, लिपिक बाबुराव भोयर, जेष्ठ कार्यकर्ते बाबुराव बोड्डेवार, पापा पार्डीकर, सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे, मारोती मोरे, विजय दळवी, अनिल सूर्यवशी, नागनाथ कोंडवाड, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, मार्च-एप्रिल 2023 मध्ये झालेल्या गारपिठ व अवकाळी पावसामुळे, जुन-जुलै 2023 मधील झालेल्या अतिवृष्टीमुळे व नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आजपर्यंत 5 लाख 14 हजार 183 शेतक-यांना 415 कोटी रुपयांचे अनुदान बॅंक खात्यावर वितरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 66 हजार 339 शेतकरी यांनी ई-केवायसी न केल्यामुळे रक्कम रुपये 42 कोटी नुकसान भरपाईचा निधी प्रलंबित आहे. तरी शेतक-यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तहसीलदारांना दिले आहेत.




