हिमायतनगर, अनिल मादसवार| माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी मोझरी ता. तिवसा जि.अमरावती येथे गेल्या 6 दिवसापासुन अन्नत्याग उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाची शासनाने अद्याप कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी हितार्थ करण्यात येणाऱ्या उपोषणाला पाठिंबा देत शासनाच्या निषेधार्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि.15 जुन 2025 रविवारी हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शहरातील व्यापारी, नागरिक, शेतकरी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन दत्ता पंडीतराव देशमुख तालुका प्रमुख हिमायतनगर यांनी केलं आहे.


महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी राज्यकर्ते शासनाला निवडणूक काळात दिलेल्या आश्वासन अथवा करून देण्यासाठी गेल्या 6 दिवसापासुन अन्नत्याग उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाच्या मह्द्यमातून दिव्यांग व विधवा महिलांना रु.6000/- मानधन देण्यांत यावे, आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यांत यावी. शेतमालाला MSP (हमीभाव ) वर 20% अनुदान देण्यांत यावे, दि.07 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यांत यावे, युवकांच्या हाताला काम द्यावे नाही तर सन्मानजनक दाम देण्यांत यावे. तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यंत याव्यात. जास्त पदसंखंच्या जाहिराती प्रसिध्द करण्यांत याव्या. शहराप्रमाणे ग्रामिण भागातील घरकुलांकरीता समान निकष लावून किमान रु.5 लाख अनुदान घरकुल लाभर्थ्यांना देण्यांत यावे.


शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यु झाल्यास आर्थीक सहाय्य देण्यांत यावे तसेच शेतमजुरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यांत यावे, पेरणी व कापणी पर्यंत मजूरीची सर्व कामे MREGS मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकांना 3.5 रषो लावून दुग्ध व्यवसाय सुध्दा MREGS ला जोडन्यात यावा हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10,000/- मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यांत यावा. अश्या विविध मागण्या मांडल्या आहेत.


या आंदोलनाला आठवडा उलटत येत असताना राज्यकर्त्यानी याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने शासनाच्या विरोधात सुरु केलेल्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा म्हणून येणाऱ्या रविवारी हिमायतनगर बंदची हाक प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. सर्वानी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन निवेदन देऊन करण्यात आले आहे.



