श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के यांच्या अध्यक्षतेत व जिल्हा सरचिटणीस संदीप केंद्रे, शहराध्यक्ष सागर महामुने, यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची संघटनात्मक बैठक पार पडली.या बैठकीत गोपाल खापर्डे यांची भाजपा सोशल मीडियाच्या तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

तांत्रिक कौशल्य, संघटन क्षमता आणि पक्षनिष्ठेचा उचित सन्मान या बाबींचा विचार करून आपल्यावर सोशल मीडिया प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली, असे गौरोद्गगार शहराध्यक्ष गोपू महामुने यांनी काढले. जिल्हा सरचिटणीस संदीप केंद्रे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खापर्डे यांचा सत्कार केला.

युवा मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप राठोड, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष फिरोज पठाण उपाख्य बाबुभाई, माजी तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, राहुल चव्हाण, मनीष राठोड, पद्मा गिऱ्हे, पांडुरंग राठोड, अपील बेलखोडे यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.



