HomeनांदेडKeshari Pagditil ‘Dada’ : केशरी पगडीतील ‘दादा’… हाक उरली, आवाज थांबला

Keshari Pagditil ‘Dada’ : केशरी पगडीतील ‘दादा’… हाक उरली, आवाज थांबला

नांदेड| “हिंद-दी-चादर” शहीदी समागमाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक : २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे भेट देत केशरी पगडी परिधान करून दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डतर्फे यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.

गुरुद्वाराच्या सुवर्णमय वास्तूतून, श्रद्धेच्या शांत पावलांनी केशरी पगडी परिधान करून चालताना अजितदादांचा तो क्षण छायाचित्रात कैद करण्यासाठी छायाचित्रकार महेश होकर्णे यांनी हाक दिली—
“दादा…”

क्षणभर थांबत, चालत-चालतच त्यांच्या खास शैलीत अजितदादांनी दिलेले उत्तर आजही कानात घुमते—
“काय रे, कसा आहेस ? पगडी बरोबर बसली ना…” तो क्षण केवळ एक छायाचित्र नव्हता, तर माणुसकीचा, आपुलकीचा आणि संवेदनशील संवादाचा जिवंत दस्तऐवज होता.

dada Keshari Pagditil ‘Dada’ : केशरी पगडीतील ‘दादा’… हाक उरली, आवाज थांबला

आज, बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बातमीने तीच आठवण पुन्हा अस्वस्थ करते. केशरी पगडीतील ते चालते पाऊल, तो हसरा प्रश्न आणि छायाचित्रकाराशी झालेला तो अनौपचारिक संवाद—आता स्मृतींमध्येच उरला आहे.

केशरी पगडीतील ती छबी आज केवळ फ्रेममध्ये नाही, तर प्रत्येक संवेदनशील छायाचित्रकाराच्या मनात कोरली गेली आहे. 🙏 अजितदादा पवार यांना छायाचित्रकार होकर्णे बंधुची भावपूर्ण श्रद्धांजली.

केशरी पगडी, आपुलकीची हाक…
आणि अचानक आलेली शांतता…

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments