नांदेड l नांदेड लोकमान्य मंगल कार्यालय नांदेड येथे ओबीसी न्याय हक्क परिषदेच्या वतीने आरक्षण बचाव लढ्याच्या पूर्व तयारीसाठी ओबीसीची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.


रविवार 8 सप्टेंबर रोजी ओबीसी आरक्षण लढ्यासाठी डॉ. बी. डी. चव्हाण, एस. जी. माचनवार व अविनाश भोसीकर यांचे नेतृत्वाखाली भव्य बैठक घेण्यात आली.

सदरील सभेत महाराष्ट्र सरकारने दुटप्पी धोरण अवलंबून ओबीसीचा विश्वासघात केला, आपला लढा कोणत्याही जातीसाठी अथवा समाजाच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात राहणार आहे. कारण सरकारने ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे, यासाठी ओबीसीचा कसलाही विरोध नाही. परंतु सरकार ओबीसीचा विचार न करता हैदराबाद गॅझेटियर लागू करून ओबीसीच्या ताटातले आरक्षण पूर्णपणे हिरावून घेण्याचे षडयंत्र केले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव लढ्यासाठी ओबीसी समाज बांधवाने वज्रमूठ आवळून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांकडून मांडण्यात आल्या.


या लढ्यासाठी प्रत्येक गाव, तालुक्यातून, जिल्ह्यातून गोलेवार समाजाने हिरीरीने व लक्षणीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर यांनी केले आहे.

सदरील बैठकीत ओबीसी हक्क परिषदेचे प्रमुख डॉ. बी. डी. चव्हाण, ओबीसी पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवाड, अविनाश भोसीकर, महेंद्र देमगुंडे बालाजीराव शिंदे, नागनाथ घीसेवाड, माजी जि. प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड भोसीकर, पी.पी.बंकलवाड, रामचंद्र येईलवाड, दत्तात्रय तोकलवाड बालाजीराव शेणेवाड, तुकाराम कैलवाड, नवनाथ बद्दरवाड, शेषराव चव्हाण, चंद्रसेन पाटील, धीरज यादव, गगन यादव, भरत यादव, बागड्या यादव, गोविंदराम सुरनर, दत्ता चापलवाड, लक्ष्मण लिंगापुरे, गंगाधर भांगे, अप्पाराव राठोड, चंद्रकांत देगलूरकर, दत्तात्रय मोहिते, लक्ष्मणराव देवदे, छत्रपती कानोडे, राजेश शिंगणवाड, सतीशजी शिंदे, गोडसे महाराज बारडडकर, ॲड. वाखर्डे, नामदेव पांचाळ व सर्व ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार समाजातील प्रमुख आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

