Golewar community ; ओबीसी आरक्षण लढ्यासाठी गोलेवार समाजाने लक्षणीय सहभागी व्हावे -ओबीसी नेते तथा प्रदेश अध्यक्ष भूमन्ना आक्केमवाड
नांदेड l नांदेड लोकमान्य मंगल कार्यालय नांदेड येथे ओबीसी न्याय हक्क परिषदेच्या वतीने आरक्षण बचाव लढ्याच्या पूर्व तयारीसाठी ओबीसीची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती.
रविवार 8 सप्टेंबर रोजी ओबीसी आरक्षण लढ्यासाठी डॉ. बी. डी. चव्हाण, एस. जी. माचनवार व अविनाश भोसीकर यांचे नेतृत्वाखाली भव्य बैठक घेण्यात आली.
सदरील सभेत महाराष्ट्र सरकारने दुटप्पी धोरण अवलंबून ओबीसीचा विश्वासघात केला, आपला लढा कोणत्याही जातीसाठी अथवा समाजाच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधात राहणार आहे. कारण सरकारने ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे, यासाठी ओबीसीचा कसलाही विरोध नाही. परंतु सरकार ओबीसीचा विचार न करता हैदराबाद गॅझेटियर लागू करून ओबीसीच्या ताटातले आरक्षण पूर्णपणे हिरावून घेण्याचे षडयंत्र केले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव लढ्यासाठी ओबीसी समाज बांधवाने वज्रमूठ आवळून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. ...
