नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीत अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून हायवा व एक जेसीबीच्या सहयाने अवैध रेती साठवुन चोरटी विक्री करत असताना पोलीस निरीक्षक ओंकान्त चिंचोलकर व त्यांच्या सहकार्यांनी रेतीचोरावर कार्यवाही करून 49 लक्ष 36 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे रेतीचोरामध्ये एकाच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन पलश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण ओमकांत चिंचोलकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत आहे. यावरून त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोहचुन पाहाणी केली असता दोन हायवा वाहन व एक जेसीबीच्या सहयाने अवैध रेती साठवुन चोरटी विक्री करत असताना मिळुन आले. त्या वाहनासह चालकास ताब्यात घेवुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 07.12.2024 रोजी 04.45 ते 06. 00 वा.चे दरम्यान गंगाबेट शिवार नांदेड येथे आरोपी गजानन मुरलीधर कदम, वय 24 वर्षे, व्यवसाय चालक रा. शेलगाव ता.लोहा जि. नांदेड, त्र्यंबक रामराव पाटील वय 24 वर्षे रा. बोरगाव ता. लोहा जि.नांदेड, कृष्णा भिवाजी वानखेडे रा. बेटसांगवी ता.लोहा जि.नांदेड यांनी रेतीची अवैद्य विनापरवाना वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या ताब्यातील सहा ब्रॉस रेती किंमती 36,000/- रूपये, व दोन हायवा वाहन किंमती 24,00,000/- रूपये एक जेसीबी किंमती 24,00,000/- रूपये असा एकूण किंमती 49,36,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गु.र.क्र.1129/2024 कलम 303(2) बीएनएस सह कलम 47.48 म.ज.म.सं. अंतर्गत माधव परसराम डफडे पोना/2606 नेमणुक नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून रेतीचोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब नांदेड (IPS) खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड सुशीलकुमार नायक उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांचे मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर, पोनि, पोस्टे नांदेड ग्रामीण पोहेकों/पांचाळ, सवनकर, पोना / माधव डफडे यांनी हा अवैद्य रित्या रेतीचोरीचा गुन्हा उघडकिस आणून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.