नांदेड l होळकर नगर सिडको नांदेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालयात सम्राट यशवंतराव होळकर,संत जगनाडे महाराज यांची जयंती व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाल वाचक मेळावा संस्थेचे अध्यक्ष गोविंदराम शूरनर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.


गोविंदराम शूरनर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, आपले पाल्याचे भविष्य उज्ज्वल होऊन राष्ट्राहित जोपासावे असे वाटत असेल तर, बालपणापासून बाळावर चांगले संस्कार केले पाहिजे. पाल्याच्या शिक्षणा बरोबर संस्कार ही दिले पाहिजे तरच भविष्यात समाज प्रबोधन करून संघटन मजबूत करण्या योग्य बनतील आणि हक्कासाठी संघर्ष योग्य पध्दतीने करतील , तरच त्यांच्या उज्ज्वल भविष्या बरोबरच राष्ट्र मजबुत घडविण्यास मदत होईल . त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण, संस्कार,संघटन , आणि संघर्ष करण्या लायक बनवावे असे प्रतिपादन शूरनर यांनी केले.

प्रमुख पाहुणे संतोष शिंदे, नारायण पतंगे यांनी महापुरूषावर भाषणे केली. यावेळी अभियंता मदनेश्वर शूरनर, या. संजीव पवळे, मा. गणेश राठोड, सुर्यकांत गुंडाळे, गौरव देवकाते, सौ सावित्रा शूरनर,सौ. ज्योती कसनकर, सौ ममता पतंगे, सौ वनिता राठोड, कु. गौरी देवकते, कु. श्रेया पतंगे,कु. नेहा राठोड, कु. पांचाळ, कु. मृणाली शूरनर, कु. श्रेयस पतंगे व अनेक वाचक वर्ग उपस्थित होते. शेवटी ग्रंथपाल मदनेश्वरी देवकाते यांनी सर्वांचे आभार मानले.
