HomeनांदेडThe students saluted : सतत १८ तास अभ्यास उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले महामानवास...

The students saluted : सतत १८ तास अभ्यास उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले महामानवास अभिवादन -NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त दि.६ डिसेंबर २०२४ रोजी सतत १८ तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानच्या अध्यक्षा विमल खराटे,सचिव ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्या श्रीमती एन.एस. जयस्वाल व प्रा.जयकुमार खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार झाला.

मागील पंधरा वर्षापासून हा उपक्रम या विद्यालयात अविरतपणे राबविल्या जाते,याव्दारे विद्यार्थांना अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण व्हावी,वाचन संस्कृती दृढ व्हावी तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून चिंतन,मनन व्हावे,त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. ह्या उद्दात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात  येते. यामध्ये इयता १० वी व १२ वी वर्गातील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला. या सुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांनी शांततेत व शिस्तीत अभ्यास करून आपल्या आयुष्याच्या शालेय जीवनातील वाचनाचा एक आगळा वेगळा अनुभव घेतला.

या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना रमेश राठोड सर ( से.नि.शि. ) दिनेश मेहेत्रे, प्रा. राज कांबळे यांनी बिस्कीट व केळीचे वाटप करून या उपक्रमाला योगदान दिले. तसेच अंजनखेड येथील रमाई महीला व तक्षशिला बौद्ध विहार समीती यांच्या तर्फे उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना एक पेन, एक रजिस्टरचे वाटप करण्यात आहे. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले होते, या अभ्यास उपक्रमाचे उद्घाटना प्रसंगी प्रा. जयकुमार खराटे यांनी प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.

समारोप प्रसंगी कु.शिवानी पेटकुले, कु.आदिती घाटगे कु.सदफ ईस्माईल शेख या विद्यार्थ्यीनीनी आपला वाचनाचा अनूभव व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत  व्यक्त केले. या उपक्रमातून आम्हाला वाचनाची आवड निर्माण होवून अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याचे सांगीतले. या उपक्रमाचे आयोजन शाळेत झाल्याने वाचनाची संधी मिळाली, यासाठी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या श्रीमती एन.एस. जयस्वाल मॅडम यांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच असाच निरंतर अभ्यास करून शाळेचे आईवडीलाचे नाव उज्वल करावे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थानी मानून मार्गक्रमण करण्याचे अवाहन केले.

यावेळी मंचावर पर्यवेक्षक एन.एम. राठोड सर, पी.एम. चव्हाण सर, वजीरे मॅडम, यु.जी. शेंडे सर , चौधरी सर , रबडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचे नेतृत्व उच्च माध्यमिक प्रमुख प्रा. विनोद कांबळे यांनी केले. यासाठी प्रा. सतिष सुकावार, प्रा. प्रेम सुर्यवंशी, प्रा. अनिल जाधव प्रा. राज कांबळे, प्रा . प्रविण बिरादार प्रा.अश्विनी गोदरे,प्रा.निर्मला राठोड,बाळू कुकडे, किशोरभाऊ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षीका प्रणिता गौड यांनी केले.या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हातून, पालक वर्गातून, वाचनप्रेमी वर्गाकडून कौतुकाचा वर्षाव होतांना दिसून येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments