नांदेड| बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील भाजपाचे युवा नेते श्री गणेशभाऊ गुरूपवार यांची 4 जुन रोजी युवा अटल फाऊंडेशन नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली सदर निवड ही अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय महामंत्री शितलजी खांडिल यांच्या आदेशानुसार व अटल फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष *गणेश रमेश राजे* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


यापुर्वी गणेश भाऊ गुरुपवार यांनी भाजपा वाहतूक तालुका अध्यक्ष, व अखिल भारतीय पद्मशाली समाज तालुका युवक सचिव तथा भाजपा युवा मोर्चा दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष नांदेड व तसेच भाजपाच्या वेगवेगळ्या पदावर उत्कृष्टरिता काम पाहिले. गणेश भाऊ यांच्या पाठीशी कुंडलवाडी व परिसरातील तरुणांची चांगली फळी उभी असुन, नांदेड जिल्ह्यात त्यांचा तळागाळात व परिसरात तगडा जनसंपर्क असुन गेली 20 वर्षापासून जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन गोरगरीब मायबाप जनतेची अहोरात्र मेहनत घेतली आहे .याच कार्याची दखल घेऊन युवा अटल फाउंडेशन नांदेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी युवा प्रदेशाध्यक्षा श्रुतीताई तुडमे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे. याच निवडीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

यावेळी उपस्थित युवा प्रदेशाध्यक्षा श्रुती ताई तुडमे अटल फाउंडेशन महाराष्ट्र व तसेच छावा मराठा संघाचे सचिव तथा पत्रकार दत्ता हमंद या संघाचे उपाध्यक्ष करण समेटवार, माजी बिलोली शहर अध्यक्ष भाजपा युवामोर्चा साई रुद्रूरकर बाबू आडबे, माजी युवामोर्चा भाजपा शहराध्यक्ष राजू माहेवार भाजपा माजी तालूका उपाध्यक्ष शिवकुमार खांडरे, प्रशांत शक्करकोट, माही तडकासाठ मारुती पाशावार, विश्वनाथ स्वामी, गंगाधर दुसलवाड, गंगाधर पोलसवाड ,दिनेश रामोड, सचिन जोरगेवार आदी उपस्थित होते.
