Ganesh Bhau Gurupwar : युवा अटल फाउंडेशन नांदेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी गणेश भाऊ गुरूपवार यांची निवड
नांदेड| बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील भाजपाचे युवा नेते श्री गणेशभाऊ गुरूपवार यांची 4 जुन रोजी युवा अटल फाऊंडेशन नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली सदर निवड ही अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय महामंत्री शितलजी खांडिल यांच्या आदेशानुसार व अटल फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष *गणेश रमेश राजे* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
यापुर्वी गणेश भाऊ गुरुपवार यांनी भाजपा वाहतूक तालुका अध्यक्ष, व अखिल भारतीय पद्मशाली समाज तालुका युवक सचिव तथा भाजपा युवा मोर्चा दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष नांदेड व तसेच भाजपाच्या वेगवेगळ्या पदावर उत्कृष्टरिता काम पाहिले. गणेश भाऊ यांच्या पाठीशी कुंडलवाडी व परिसरातील तरुणांची चांगली फळी उभी असुन, नांदेड जिल्ह्यात त्यांचा तळागाळात व परिसरात तगडा जनसंपर्क असुन गेली 20 वर्षापासून जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन गोरगरीब मायबाप जनतेची अहोरात्र मेहनत घेतली आहे ...
