bogus water supply : अधिवेशनाच्या काळात थेट मंत्री महोदयाकडे मांजरम गावच्या बोगस पाणीपुरवठ्याची तक्रार

नांदेड| मांजरम गावची पाणीपुरवठा योजना निर्मितीत अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे अपूर्ण राहिलेली आहे. या योजनेच्या विरोधात अनेकदा गावकऱ्यांनी निवेदने दिली होती. गावामधील लोकांनी हंडा मोर्चा आंदोलन सुद्धा केले होते.

तरीपण अद्याप संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. त्यामुळे आज मुंबई येथे चालू असलेल्या अधिवेशन काळात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

संतोष कन्स्ट्रक्शन व रोहित कन्स्ट्रक्शन आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मांजरम गावची पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ केलेला आहे. शासनाला आमची नम्र विनंती आहे, संबंधित कंत्राटदारावर व अधिकार्‍यावर कायदेशीर कारवाई करावी आणि महत्वकांक्षी गावची पाणीपुरवठा योजना यशस्वी करावी हीच आमची मागणी आहे. सरकारने जर योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही कायदेशीर लढाई न्यायपालिकेत लढणार आहोत. अशी प्रतिक्रिया पांडुरंग शिंदे मांजरमकर, नायगाव तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प)यांनी दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button