हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिराच्या प्रांगणात मेडिकल असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन (Medical Association’s blood donation camp) करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, सायंकाळपर्यंत जवळपास 50 जणांनी रक्तदान करून या शिबिरात सहभाग नोंदविला आहे.

ऑल इंडिया केमिस्ट अससोसिएशनच्या 50 वर्ष अमृत महोत्सव व जगन्नाथ अप्पा शिंदे अध्यक्ष ऑल इंडिया केमिस्ट अससोसिएशन यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हिमायतनगर केमिस्ट असोशियेशनतर्फे येथील श्री परमेश्वर मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी 11 वाजता या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन करून झाली. या शिबिरात जवळपास 50 जणांनी रक्तदान करून यात सहभाग घेतला होता.

रक्तसंकलनाचे काम नांदेड येथील जिजाऊ ब्लड बैंकेच्या डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी डॉ. शेषराव चव्हाण, डॉ. डी डी गायकवाड, डॉ. गणेश कदम, डॉ.आनंद माने, डॉ.प्रसन्न रावते, डॉ. दिगंबर वानखेडे, डॉ. विकास वानखेडे, डॉ.बालाजी मिराशे पवणेकर, डॉ.मुक्कावार, डॉ मंगेश देवसरकर, डॉ पारवेकर, डॉ ढगे, डॉ बालाजी कदम भिसिकर, विकास पाटील देवसरकर, परमेश्वर मंदिराचे संचालक अनिल मादसवार, संचालक संजय माने, संचालक विलासराव वानखेडे, गोविद गोखले, रामराव पाटील, पत्रकार अनिल भोरे, नागेश शिंदे, विजय दळवी, शेवाळकर, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मेडिकल असोशियनचे अध्यक्ष शंकर पाटील, सतीश सूर्यवंशी, अमोल पेन्शनवार, श्रीकांत माने, विनोद आरेपल्लू, नीळकंठ पाटील, किशन पाटील कदम, निलेश देवसरकर, विशाल जाधव, पुंडलिक पवार सोनारीकर, बंडू गायकवाड, पिंचा, आदींसह मेडिकल असोशियनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
