नांदेडकृषी

for additional compensation : अधिकच्या नुकसान भरपाईसाठी दुसऱ्यांदा विमा कंपनीस पूर्वसूचना देण्याचे आवाहन – NNL

नांदेड| माहे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवडयात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली ही एक आपत्ती घटना मानली जाते. त्याअनुषंगाने यानंतर जर पुन्हा मोठा पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास लाभार्थी पुन्हा विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ शकतात. जेणेकरुन संबंधित लाभार्थ्यांना अधिकची नुकसान भरपाई नुकसानीच्या प्रमाणात मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दुसऱ्यांदा पूर्वसूचना देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जर 25 टक्के पेक्षा पूर्वसूचना येत असतील तर अशा ठिकाणी लागू व्हायची नियमावली ही विमा कंपनीकडून बदलण्यात आलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा समितीने 25 टक्के अग्रीम देण्यासाठी मध्यावधी नुकसान अर्थात मीड सीजन ॲडव्हर्सिटी अधिसूचना लागू केलेली आहे. त्यामुळे या कालावधीत झालेल्या नुकसानीचे वैयक्तीक पंचनामे हे वेगळे करण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र या सर्व शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई लागू झाल्यास अदा केली जाईल.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button