हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक १७ मधील फुलेनगरच्या रहिवाश्याना मागील हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर होऊनही केवळ नमुना नंबर 43 चे प्रमाणपत्र नसल्याने बांधकाम परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांनी तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर नगरपंचायतीने दिलेल्या लेखी आश्वासनाने फुले नगरवासियांचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे (Finally, with the written assurance given by the Nagar Panchayat) घेण्यात आले आहे.

शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मधील रहिवाश्याचा हक्काच्या घरासाठी संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होता. येथील बऱ्याच नागरिकांना मागिल काळात प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाली. मात्र मालकी हक्काचा पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या नमुना नंबर 43 चे प्रमाणपत्र देण्यास नगरपंचायत चालढकल करत होती. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नगरपंचायतीला पत्र देऊन घरकुलासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आदेशित केले असताना अनावश्यक करणे दाखविली जात होती.

त्यामुळे हिमायतनगर शहरातील फुलेनगरच्या नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून अमरण उपोषण सुरु केले होते. अमरण उपोषनाला ध्वजारोहण करण्यासाठी आलेल्या प्रभारी मुख्याधिकारी यांनी भेट देखील दिली नव्हती. त्यामुळे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेकडो महिला पुरुषांनी चुलबंद ठेऊन पाठिंबा दिला. एव्हढंच नाहीतर नगरपंचायत कार्यालयासमोर उपस्थित होऊन मागणीचे निएडन दिले. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात आला होता.

याची धास्ती घेऊन नगरपंचायतीने अखेर नागरिकांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र दिल्याने सोमवारी सायंकाळी आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या संदर्भात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पत्राचा संदर्भ देऊन प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून हि बाब निदर्शनास आणून देत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्याची विनन्ती केली होती.

त्यानंतर नगरपंचायतीचे कक्ष अधिकारी श्री महाजन व त्यांच्या सर्व स्टाफने लेखी आश्वासनांचे पत्र तीन दिवसापासून अण्णा पाण्याविना बसलेल्या उपोषणकर्ते सुभाष दारवंडे, मोहम्मद इम्तियाज खान, जहीर मिरझा व इतर सर्व उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, फेरोज खान पठाण, अश्रफ भाई, बाकी सेठ, फेरोज कुरेशी, आदींसह नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी, उपोषणकर्ते व पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.