Finally, with the written assurance given by the Nagar Panchayat : अखेर नगरपंचायतीने दिलेल्या लेखी आश्वासनाने फुले नगरवासियांचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे
हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक १७ मधील फुलेनगरच्या रहिवाश्याना मागील हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर होऊनही केवळ नमुना नंबर 43 चे प्रमाणपत्र नसल्याने बांधकाम परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांनी तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर नगरपंचायतीने दिलेल्या लेखी आश्वासनाने फुले नगरवासियांचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे (Finally, with the written assurance given by the Nagar Panchayat) घेण्यात आले आहे.
शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मधील रहिवाश्याचा हक्काच्या घरासाठी संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होता. येथील बऱ्याच नागरिकांना मागिल काळात प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाली. मात्र मालकी हक्काचा पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या नमुना नंबर 43 चे प्रमाणपत्र देण्यास नगरपंचायत चालढकल करत होती. नांदेडच...
