लोहा| नाहिरे वाले,भटके, उपेक्षित ,निरक्षर यांच्या समस्येचा आवाज गुराखी साहित्य संमेलनात हे व्यासपीठ उठविते. गेल्या ३० वर्षापासून भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून चालणारे हे साहित्य संमेलन जिभेवर असलेल्या साहित्याची जपणूक करते .या साहित्याचे जतन करण्यासाठी निश्चितच प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे (Prof.Dr. Purushottam Dhondge ) यांनी व्यक्त केला.

गुराखी गड किरोडा (ता लोहा), येथे प्रजासत्ताक दिनी ३०व्या गुराखी साहित्य संमेलनास ज्ञानहंडी फोडून उद्घाटन देविदास फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले भाई डॉ केशवराव धोंडगे गुराखी साहित्य नगरी असे नाव देण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक कवी देविदास फुलारी यांचे हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष दत्ता देवकांबळे, होते स्वागताध्यक्ष डॉ.पुरुषोतम केशवराव धोंडगे,असून गुराखी पीठावर माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड , प्रमुख पाहुणे यादवराव कोलंबकर , राघिणी देवकर, दिलीप चव्हाण ,बायनाबाई शामराव पवार प्राचार्य निवृत्ती कौशल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

कामाईच्या झऱ्यापासून विद्यार्थ्याचे लेझीम ,टाळ, मृदंग,.गुराखी,सालदार,पोतराज,वासूदेव,बहुरूपी, बैलवाले, शाहीर,देवकर,राईंदर, फकीर , लमाणी गीताचे गायन ,गोंधळी अशा विविध ग्रामीण कलाकारांनी देखाव्यांसह सजून नटून-थटून पायी दिंडी गुराखी गड गेली त्यानंतर संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाध्यक्ष दत्ता मामा देवकांबळे,पांडुरंग कौसल्ये ,युवा किर्तनकार सदानंद गुरूजी रायवाडीकर, उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यिक तथा कवी देवीदास फुलारी व स्वागताध्यक्ष प्रा डॉ भाई पुरुषोत्तम धोंडगे,राघिणी देवकर,डी एस बोधगिरे, निवृत्ती कौशल्ये आदींच्या हस्ते ज्ञानहांडी फोडून संमेलनाला प्रारंभ झाला.

स्वागताध्यक्ष प्रा. डॉ पुरूषोत्तम धोंडगे यांनी नाहीरे वाले, कुणबी राजे सरदार राजे गुराखी कलावंतांना आपल्या कला गुण गुराखी पिठावर सादर करण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ भाई धोंडगे यांनी ३० वर्षा पासून उपलब्ध करून दिले आहे समाजातील सर्वच उपेक्षितांना, नाहिरेवाल्यांना न्याय द्यायचे काम केले आणि करणार आहोत. स्वाभिमानाने मर्दुमकीने जगायला लढायला शिकवलं तो अधिकार गुराखी पीठाने दिला असे प्रा पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले. उद्घाटक कवी देविदास फुलारी यांनी गुराखी साहित्य संमेलनाचे महत्व विशद केले.

यावेळी माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे,माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड,शंकरराव आंबटवाड,व्ही जी चव्हाण, उप प्राचार्य एस वि मंडगे ,प्रा.नागपुर्णे, मुख्याध्यापक एस आर लुंगारे ,मुख्याध्यापक डी एस बोधगिरे, हरि पाटील शिंदे, बालाजी परोडवाड, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते उदघाटन सत्राचे सुत्रसंचलन माधवराव पेठकर यांनी केले आहे.