नांदेडस्पोर्ट्स

Nanded : मैदान तापलं, उत्साह उसळला! नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

नांदेड| नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्था अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल मधील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा स्पर्धांना गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. दिलीप गवई, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, कार्यकारणी सदस्य एड. सी बी दगडिया, कॉ. प्रदीप नागपूरकर, डॉ. कुंजम्मा काब्दे, डॉ. अजीत काब्दे, प्राचार्य. लक्ष्मण शिंदे, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर, मुख्याध्यापक नितीन सेलमोकर, उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे, विलास वडजे, राहुल गोरे यांची उपस्थिती होती.

शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास, संघ भावना, खेळाडू वृत्ती वृद्धिंगत व्हावी, शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आदी स्पर्धांचा समावेश असून सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे या स्पर्धा रविवार (दिनांक 28) पर्यंत उत्साहात रंगणार आहेत. शिक्षक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

यावेळी बोलताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन म्हणाले की नांदेड एज्युकेशन सोसायटी ही गेल्या चार वर्षांपासून आपल्या तीन घटक संस्थांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा संस्थेचे उपाध्यक्ष सी.ए. डॉ. प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करीत आहे. त्यामुळे निश्चितच शिक्षक व कर्मचारी यांच्यामध्ये खेळ भावना वृद्धींगत होत आहे.

1001237133 scaled Nanded : मैदान तापलं, उत्साह उसळला! नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

प्रास्ताविकात सीए. डॉ. प्रवीण पाटील म्हणाले की, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये फारसा समन्वय असत नाही, ते एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अतिशय पूरक आहे. तसेच आपले हेवे दावे दूर करून एक खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. दिलीप गवई यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या आरोग्यासाठी खेळाचे महत्व पटवून देत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कदम यांनी केले तर आभार प्रा. एकनाथ खिल्लारे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!