Blog

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट – नाना पटोले -NNL

विधानसभेचे जागावाटप मेरिटनुसार झाले तर मविआतील सर्व मित्र पक्षांना फायदाच नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

मुंबई| लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच उद्देश आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अधक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला झाला. आताही विधान सभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकत्रित लढायचे असेल तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. काँग्रेसने सर्व जागांवर तयारी केली तर त्याचा फायदा मित्रपक्षांनाही होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी मेरिटचा विचार केला असता तर आणखी चांगले परिणाम दिसले असते.

राज्यातील भाजपा सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हेच महत्वाचे आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या नावाने योजना करुन कोट्यवधी रुपये लुटले आहेत. डीबीटी योजनेतून टेंडर न काढता मुख्यमंत्र्यांनी खरेदी करुन लुट केली. सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत पण त्यांच्या नावावर लुट मात्र सुरु आहे. बांधकाम विभागाच्या जागा तारण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे. राज्याच्या जनतेला कर्जात डूबवण्याचे काम सुरु आहे, या सर्व मुद्द्यांवर अधिवेशनात सरकारला जाब विचारु असेही नाना पटोले म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, छगन भुजबळांना त्रास होत आहे हे स्पष्ट दिसत आहे, भाजपा हा ओबीसीची नेतृत्वाची नेहमीच अवहेलना करते आला आहे. ओबीसी नेता भाजपाच्या सानिध्यात असेल तर त्याला टार्गेट केले जाणारच. गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. याच छगन भुजबळांना जेलमध्ये टाकले होते, त्यावेळी ते डाकू होते आता ते संन्यासी झाले आहेत. भाजपाला ओबीसींची मते हवी आहेत नेते मात्र नको आहेत.

NEET परीक्षेत केवळ ग्रेस मार्क्सचा मुद्दा नव्हता तर या परीक्षेत घोटाळा झालेला आहे, पेपर लिक झाला आहे हे गंभीर आहे. NEET परीक्षेला बसलेल्या देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. परीक्षा केंद्र व कोचिंग क्लासेसवाल्यांची अभद्र युती झालेली आहे आणि त्यातून हा घोटाळा झालेला आहे. केंद्रातील भाजपा सरकार NTA च्या खांद्यावर बंदुक ठेवून आपली जबाबदारी झटकू पहात आहे. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!