हिमायतनगर| साहित्यरत्न डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेची एक महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष पंडीत वाघमारे यांच्या उपस्थितीत नुकतीच घेण्यात आली. सदरील बैठकीमध्ये सर्वानुमते सामाजिक कार्यकर्ते संदिप उत्तमराव गुंडेकर यांची संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.


तर इतर कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष बालाजी बनसोडे, सचिव गजानन बनसोडे, सह सचिव विकास मनपूर्वे, शहरप्रमुख गजानन वाघमारे, सोशल मिडीयावर दयानंद वाघमारे यांचा समावेश करण्यात आला आहे. संदिप गुंडेकर यांच्या निवडीबद्दल अनेकांनी अभिनंदन करूण पुढील कार्यासाठी सुभेच्छा दिल्या आहेत.


या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते संतोष हातवेगळे, संतोष बनसोडे, पांडुरंग गाडगे, राम गुंडेकर, संजय गुंडेकर, पवन बनसोडे, मारोती गाडेकर, बालाजी शिराणे, बाबुराव बनसोडे आदिंची प्रामूख्यानं उपस्थती होती.




