Sahasrakund waterfall : सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची सुरक्षा धोक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावं

नांदेड, अनिल मादसवार| विदर्भ मराठवाडा सीमेवरन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा मागील काळात झालेल्या पावसाच्या पाण्याने प्रवाहित झाला आहे. निसर्गनिर्मित धबधबा डोळ्यात साठवून ठेवणे हि पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत (The District Collector and Superintendent of Police should pay attention to the safety of tourists at Sahasrakund waterfall) आहेत. दरम्यान काही हौशी पर्यटक या ठिकाणी लावलेल्या सुरक्षा कठड्याला ओलांडून (भेदून) नदी पात्रात सेल्फी काढण्यासाठी स्टंटबाजी करत आहेत. त्यामुळे सुरक्षा धोक्यात आली आहे.


हिमायतनगर – किनवट तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या इस्लापूर गावापासून ४ कि.मी. अंतरावर पैनगंगा नदीच्या किनार्यावर असलेल्या बाणगंगा महादेव मंदिराच्या पायथ्याशी १०० ते ९० फुटावरून कोसळणाऱ्या सहस्रकुंड धबधब्याचे निसर्गनिर्मित्त दृश्य आहे. ८० फुट उंच हवाई मनोरे वरून सहस्त्रकुंड धबधबा पाहत येतो. धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मराठवाड्यातूनच नव्हे तर तर मुंबई, पुणे, हैदराबाद, म्हैसा, निझामाबाद, आदिलाबाद, यवतमाळ सारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पोलीस बंदोबस्त नसल्याने पर्यटक धबधबा परिसरात जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी एखादी अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागल्या आठवड्यात चार ते पाच जण थेट धबधबा पडणाऱ्या ठिकाणापर्यंत गेले होते. यावेळी पाय घसरुन पडले दैव बलवत्तर म्हणून काही झाले नसल्याने मोठी दुर्घटना टळली.


परंतु या ठिकाणी हौशी युवक – युवती नदी पत्रातील पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मागील काळात अनेक घटना घडल्या होत्या. हि बाब माहित असताना अद्याप या ठिकाणी केवळ सूचना फलक लावण्याव्यातिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अधून – मधून या ठिकाणी दुदैवी घटना घडत आहेत. याकडे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पर्यटकांची गरज लक्ष देऊन पर्यटन स्थळाच्या विकासासाठी पाऊले उचलावीत आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त लावावा. धबधबा व नदीपात्र परिसरात जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा गार्ड नेमावे आणि अशी मागणी या भागातील जनतेतून केली जात आहे.





