Homeनांदेडनानक साई फाउंडेशनच्या १० व्या घुमान यात्रेची तयारी सुरु, सहभागी व्हावे,यात्रा समितीचे...

नानक साई फाउंडेशनच्या १० व्या घुमान यात्रेची तयारी सुरु, सहभागी व्हावे,यात्रा समितीचे आवाहन -NNL

नांदेड। संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेल्या नानक साई फाउंडेशनच्या १० व्या घुमान यात्रेची तारीख निच्छित झाली असून १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान यात्रा होणार आहे.

घुमान यात्रेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र घुमान म्हणजे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी यासह सुवर्ण मंदिर अमृतसर,शक्तीपिठ माता नैनादेवी (हिमाचल प्रदेश),आनंदपूर साहिब,कार्तिकी स्वामी अचलेश्वर धाम,भाकरानंगल डॅम,वाघा-अटारी बॉर्डर, जालियनवाला बाग,महाभारत (धर्मनगरी) कुरुक्षेत्र,माता भद्रकाली,फतेहगड साहिब,बस्सी पठाणा,पानिपत,वीरासते खालसा म्युजियम, लवकुश जन्मस्थळ,परजीया कलान (खेडेगाव) या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविले जाते.. पंजाब-हरियाणा-हिमाचल प्रदेश या राज्यातून यात्रेचा प्रवास असणार आहे.

संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासोबतच दोन राज्याना जोडणारा सेतु म्हणून घुमान चळवळ आपली महत्वपुर्ण भूमिका वठवत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमिताने सुरु झालेली ही चळवळ लोकप्रिय ठरली असून ११ हजार भक्तांना संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन टप्याटप्याने घडविण्याचा संकल्प आहे. नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे मागील १० वर्षापासून आयोजन केले जाते. आतापर्यंत झालेल्या ८ यात्रेतून सुमारे २४०० जण सहभागी झाले.

नांदेड,मुंबई सह महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू राज्यातील मंडळी मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने यात्रेत सहभागी होतात. यात्रेला लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांचा कृपाआशीर्वाद प्राप्त आहे. या चळवळीमुळे पंजाब व महाराष्ट्रातील भाऊबंधकीचे नातेसंबंध अधिक मजबूत होत आहेत.घुमान वारीत सहभागी व्होण्याचे आवाहन नानक साई फाऊंडेशन व संत नामदेव घुमान यात्रा संयोजन समितीच्या (9823260073) वतीने करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments