नांदेडसोशल वर्क

Independence Day is celebrated : उस्माननगर परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

उस्माननगर| उस्माननगर व परिसरात मोठ्या उत्साहाने भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा ( अमृत महोत्सव) वर्धापन दिन विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी पोलीस स्टेशन येथे सपोनि चंद्रकांत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव बालमुकुंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी , कमलाकरराव देशपांडे, अरूण देशपांडे , प्रदीप देशमुख , आदी संस्थेचे संचालक मंडळासह मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड , पर्यवेक्षक राजीव आंबेकर , शिक्षकवृंद , प्राध्यापक वृंद , गावातील प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार उपस्थित होते. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवर मंडळी यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष देवरावजी सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनसळे , मन्मथ केसे , देविदास डांगे , भगवान राक्षसमारे ,( नितिन) सिध्दोधन लाटकर , समता जोंधळे , मणिषा भालेराव , सोनकांबळे यांच्या सह गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. सेवा सहकारी सोसायटी येथे चेअरमन तथा ग्रामपंचायत सदस्य रूद्र ( संजय ) वारकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व सभासद , नागरिक उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच सौ. शोभाबाई शेषेराव पाटील काळम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह येथे सपोनि चंद्रकांत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वसतिगृहातील अधीक्षक लक्ष्मण कांबळे, यांच्यासह कर्मचारी , गावातील नागरिक , विद्यार्थी उपस्थित होते. अरबीया मदरसा दारूलूम मध्ये काजी साब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गावातील सर्व झेंडावंदनास गावातील प्रतिष्ठित ग्रामविकास अधिकारी सौ. डि. शिंदे – माने , सरपंच सौ शोभाबाई शेषेराव काळम , उपसरपंच बाशीदभाई शेख , माजी सरपंच तुकाराम वारकड गुरूजी , माजी उपसरपंच वैजनाथ पाटील घोरबांड , माजी उपसरपंच आनंदराव पाटील घोरबांड , शिवशंकर काळे , संजय वारकड , गंगाधर भिसे , गोविंद पोटजळे , कमलाकर शिंदे ,अंगुलिकुमार सोनसळे , प्रा. विजय भिसे , काजी साहेब,बाबू पिंजारी , रामराम सोनसळे ,बालाजी पु.घोरबांड, अमिनशाह फकिर , नरेश शिंदे , अशोक काळम , संदिप घोरबांड ,मारोती घोरबांड, तलाठी पाटील ,विश्वनाथ मोरे ( पोलीस पाटील )गंगाधर भिसे ,गंगाधर कांबळे , सरपंच प्रतिनिधी शेषेराव काळम ,गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

उस्माननगर येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी कृषी सहायक अधिकारी कै.डि.बी.पाटील काळम यांच्या अल्पशा आजाराने निधन झाल्याने शाळेतील सर्व कार्यक्रम रद्द करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ नागरिक श्री. विठ्ठलराव शंकरराव वारकड यांची गावातील सर्व विविध ठिकाणच्या ध्वजारोहणास विशेष उपस्थिती दिसून आली. ७७ वा भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी महापुरुषांच्या वेशभूषा रेखाटून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button