Independence Day is celebrated : उस्माननगर परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL
उस्माननगर| उस्माननगर व परिसरात मोठ्या उत्साहाने भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा ( अमृत महोत्सव) वर्धापन दिन विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी पोलीस स्टेशन येथे सपोनि चंद्रकांत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे माजी मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव बालमुकुंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी , कमलाकरराव देशपांडे, अरूण देशपांडे , प्रदीप देशमुख , आदी संस्थेचे संचालक मंडळासह मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड , पर्यवेक्षक राजीव आंबेकर , शिक्षकवृंद , प्राध्यापक वृंद , गावातील प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार उपस्थित होते. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवर मंडळी यांच्या...
