नांदेडमहाराष्ट्र

Kai Sudhakarrao Doifode Life Award : कै.सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव आणि युवा पत्रकारिता पुरस्काराचे 22 रोजी वितरण डॉ.भालचंद्र कानगो यांचे व्याख्यान

नांदेड| ज्येष्ठ समाजवादी नेते व दै.प्रजावाणीचे मुख्य संपादक दिवंगत सुधाकरराव डोईफोडे (Kai Sudhakarrao Doifode Life Award) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार व राज्यस्तरीय युवा पत्रकारीता पुरस्काराचे विरतण सोहळा व ज्येष्ठ विचारवंत कॉ.डॉ.भालचंद्र कानगो यांचे व्याख्यान बुधवार दि.22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पीपल्स कॉलेज परिसरातील कै.नरहर कुरुंदकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

bhalchandr kango Kai Sudhakarrao Doifode Life Award : कै.सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव आणि युवा पत्रकारिता पुरस्काराचे 22 रोजी वितरण डॉ.भालचंद्र कानगो यांचे व्याख्यान

दिवंगत सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ साथी व विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा.राजाराम वट्टमवार यांना तसेच कै.सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार सायं दै.नांदेड वार्ताचे मुख्य संपादक ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांना जाहीर झाला आहे. प्रा.राजाराम वट्टमवार व ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांना मान्यंवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ.भालचंद्र कानगो यांचे बदलते राजकारण आणि चळवळी पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा.प्रा.रविंद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुधाकरराव डोईफोडे पुरस्कार समितीचे सचिव तथा प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष सूर्यकांत वाणी यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!