नांदेड| ज्येष्ठ समाजवादी नेते व दै.प्रजावाणीचे मुख्य संपादक दिवंगत सुधाकरराव डोईफोडे (Kai Sudhakarrao Doifode Life Award) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार व राज्यस्तरीय युवा पत्रकारीता पुरस्काराचे विरतण सोहळा व ज्येष्ठ विचारवंत कॉ.डॉ.भालचंद्र कानगो यांचे व्याख्यान बुधवार दि.22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पीपल्स कॉलेज परिसरातील कै.नरहर कुरुंदकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

दिवंगत सुधाकरराव डोईफोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ साथी व विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा.राजाराम वट्टमवार यांना तसेच कै.सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार सायं दै.नांदेड वार्ताचे मुख्य संपादक ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांना जाहीर झाला आहे. प्रा.राजाराम वट्टमवार व ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांना मान्यंवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ.भालचंद्र कानगो यांचे बदलते राजकारण आणि चळवळी पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा.प्रा.रविंद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुधाकरराव डोईफोडे पुरस्कार समितीचे सचिव तथा प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष सूर्यकांत वाणी यांच्यासह संयोजन समितीने केले आहे.
