नांदेड/लोहा| जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येणाऱ्या मारतळा गावाजवळ दिनांक १८ रोजी दुचाकीचा अपघात (two-wheeler accident) झाला होता. या अपघातात नरसी येथील दोघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरु असताना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उरविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाहेद मुबारक शेख वय २८ वर्ष असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड- हैदराबाद महामार्गावर लोह तालुक्यातील मौजे मारतळा गावाजवळ नांदेडहून नरसीकडे दुचाकी क्रमांक एमएच २६ सीएल २२२७ वरून जात असताना दिनांक 18 रोजी दुचाकीचा अपघात झाला होता. यात वाहेद मुबारक शेख हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, महामार्ग पोलिसाच्या मदतीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र यात गंभीर जखमी झालेल्या वाहेद यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले फैजल तांबोळी या जखमीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दिनांक 19जानेवारी रविवारी दुपारनंतर नरसी येथील स्मशानभूमीत वाहेद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
