करियरनांदेड

Devidas Phulari : देविदास फुलारी यांची शिरूर अनंतपाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड -NNL

नांदेड| साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ शिरूर अनंतपाळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक , समीक्षक, कवी देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे . फुलारी यांना आज साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने अध्यक्ष पदाचे निमंत्रण पत्र देण्यात आले आहे.

मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या अनेक साहित्यकृती देविदास फुलारी यांनी दिले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, समष्टीच्या कल्याणाचा विचार पेरणाऱ्या देविदास फुलारी यांनी साहित्य चळवळीला दिलेले योगदान अतुलनीय असेच राहिले आहे. त्यांच्या या साहित्य सेवेमुळे महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोरया लॉन्स शिरूर आनंदपाळ येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे.

IMG 20241225 WA0071 Devidas Phulari : देविदास फुलारी यांची शिरूर अनंतपाळ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड -NNL

या निवडीचे पत्र साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बालाजी येरोळे यांच्यासह शिवाजी मादलापुरे , प्रभाकर कुलकर्णी , किरण कोरे , मार्तंड कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम, प्रा. महेश मोरे , राम तरटे आदींची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!