Fourth day of indefinite strike : सिटु व लोकविकास समन्वय संघर्ष समितीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन चौथ्या दिवशी

हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील नगरपंचायत समोर गेल्या चार दिवसापासून सिटु व लोक विकास संघर्ष समितीच्या वतिने शहरातील नागरिकांच्या प्रलंबीत मागण्या व दिलेल्या लेखी आश्वासनाची त्वरीत अंमलबजावनी करण्यासाठी दि.२३ जानेवारी २०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलन (Fourth day of indefinite strike) सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात महिला व पुरुष नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.

शहरात मागील ७० वर्षा पासून अनेक नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्या नावावर घर करावे, नमुना नं. ४३ (अ) मालकी हक्क प्रमाण पत्र देण्यात यावे. तसेच घरकुल बांधण्यासाठी ५ लाख रूपयाची प्रत्येकी तरतूद करावी, नगर पंचायत हिमायतनगर येथील कंत्राटी सफाई कामगार यांचे हजेरी पुस्तक तयार करून बँकेतून पगार देण्यात यावी, त्यांच्या खात्यावर पी. एफ भरणे व आठवड्यातून एक सुट्टी देण्यात यावी. याबाबत मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांनी लेखी पत्र दिले असून, त्याची त्वरित आमलबजावनी करावी. सफाई (कंत्राटी) कामगाराचे थकित वेतन फरकासह देणे व किमान वेतन कायद्याची अंमलबजावनी करावी.

मनरेगा अंतर्गत शहरात व तालुक्यात राजगार हमेची कामे उपलब्ध करा व नियमित जॉब कार्ड वाटप करून ज्यांना काम दिले नाही त्यांना बेकारी भत्ता द्या. आणि शहरातील नळयोजनेचे काम तात्काळ पूर करून पाणी टंचाईची समस्या सोडवा या मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून, या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड दिगांबर काळे करत असून, या आंदोलनात जयश्रीबाई बिजेवार, गणेश रच्चेवार, कांताबाई बनसोडे , नविन मादसवार, परमेश्वर सुर्यवंशी, वैशाली जलेवार, गंगाधर गायके, धुरपतबाई तुंगेवाड, रेणुकाबाई माने आदींसह अनेकजण सहभागी झाले आहेत. 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button