Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील श्रद्धास्थान असलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात चतुर्थीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत मोठी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, दोन ते तीन कुलूप असलेला लोखंडी गल्ला तोडून त्यातील रोख रक्कम व इतर साहित्य लंपास केले आहे. एवढेच नव्हे तर, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्हीचा DVRही चोरून नेण्यात आला आहे.

ही घटना शुक्रवार, दिनांक ६ रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास आली. मंदिरात झालेली तोडफोड व चोरी पाहून भाविकांनी तत्काळ मंदिर समितीला माहिती दिली. त्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत प्राथमिक पाहणी केली.

oplus_0

पोलिसांनी या घटनेचा तपास श्वान पथकाच्या मदतीने करण्यात येईल, असे सांगितले आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे हे मंदिर पूर्वीही चोरट्यांच्या निशाण्यावर राहिले असून मागील काही वर्षांत ७ ते ८ वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांचा तपास अद्याप पूर्णपणे उघडकीस आलेला नसतानाच, आता चतुर्थीसारख्या पवित्र दिवशीच पुन्हा चोरी झाल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

oplus_0

वाढोणा येथील वरद विनायक मंदिर इच्छा पूर्ण करणारे मंदिर म्हणून ओळख असलेल्या या देवस्थानात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास लावून दोषींना अटक करावी, तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी भाविक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

oplus_0

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button