HomeनांदेडFood kits distribution ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक धान्य...

Food kits distribution ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक धान्य किट वाटप

नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज सोनेकर यांच्या वतीने दिव्यांग कुटुंबांना एक महिन्याचे जीवनावश्यक धान्य किट वाटप करण्यात आले.

हा उपक्रम नांदेड येथील संत गाडगेबाबा चौका जवळील साई मंदिर परिसरात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

IMG 20250413 WA0012 Food kits distribution ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक धान्य किट वाटप

नांदेड शहरातील अधिक विविध दिव्यांग व्यक्तींना एक महिना पुरेल इतके राशन किट वाटप करून सुरज सोनेकर यांनी सामाजिक भान जपत एक वेगळा पायंडा पाडला. या प्रसंगी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, जयस्वाल मॅडम, गोल्डन मॅन शंकपाळ, रवी लोहाळे मुखेडकर, परमेश्वर दीपके यासह आदींची उपस्थिती होती. सामाजिक एकोपा व सहकार्याचा प्रेरणादायी संदेश देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments