किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या इस्लापूर येथील सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ धबधब्याच्या कुंडात एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची घटना 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास उघडकीस आल्याने या घटनेने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.


सहस्रकुंड धबधब्याच्या कुंडात पाण्यावर तरंगताना एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह परिपूर्ण फुगल्याने हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून आला की याचा घातपात करून कुंडात फेकला असा अंदाज लावणे आता कठीण झाले आहे. हा मृतदेह कुंडाच्या खालच्या बाजूने आणि विदर्भाच्या सिमेत असल्याने या घटनेची दखल घेत विदर्भ बिटरगावच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.


पंचनामा करून हा मृतदेह येथील भोई यांच्या साह्याने हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या साह्याने केलीय. मात्र हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने हा मृतदेह कोणाचा याचा तपास लावणे आता बिटर गावच्या पोलीस समोर एक आव्हान आहे.
