नांदेडमहाराष्ट्रव्हिडीओ

Citizens in the low-lying areas of Vishnupuri Dam should be careful | विष्णूपुरी बंधाऱ्याच्या सखल भागातील नागरिकांनी सावध असावे : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के क्षमतेने भरला आहे.त्यामुळे कधीही बंधार्‍याच्या दाराला उघडले जाऊ शकते. नदीपात्रात त्यामुळे विसर्ग वाढेल.प्रकल्पाच्या पुढील गावांनी सतर्क असावे, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

6ee8ca233e6b9dae77461470c1d2123b1694241436169737 original Citizens in the low-lying areas of Vishnupuri Dam should be careful | विष्णूपुरी बंधाऱ्याच्या सखल भागातील नागरिकांनी सावध असावे : जिल्हाधिकारी - NNL

नांदेड जिल्हयातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आज दि. 25 रोजी 83% क्षमतेने भरला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे.

त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवित्वाचे, पशुधनाचे,वीटभट्टी साहित्याचे नुकसान होणार नाही,यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!